मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये एक तरी आशा वर्कर्स (ASHA) असते, या लेखात आशा वर्कर्स (ASHA) सर्व माहिती मराठीमध्ये आता तुम्ही म्हणा कि सर आम्हाला हि आशा कोण असते तेच माहित नाही. हा पण आमचा गावामध्ये आशा नावाची बाई आहे. तर मित्रांनो हा प्रश्न सर्वाना पडू शकतो किंवा काही हुशार व्यक्ती असतील त्यांना माहित सुद्धा असते बर का !
पण या लेखा मध्ये आपण आशा कोण असते नेमक त्याचं काम काय? आणि जर तुमच्या पैकी कोणी महिला असेल तर त्या कशाप्रकारे हे पद मिळवू शकता, आणि तुमच्या आई किंवा ताई किंवा तुमची बायको असेल तर, त्याच्या साठीची पात्रता कोणती? आणि त्याचे काम कोणते आणि त्यांना पगार किती मिळतो. आणि त्याचे काम किती तास असते? तुम्ही पण करू शकता का? सर्व प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.
आशा वर्कर्स (ASHA) – कोण असतात? सर्व माहिती मराठी मध्ये.
सर्वात पहिले आशा या नावाचा अर्थ समजून घेऊ…
- Accredited Social Health Activist (ASHA) हा त्याच्या नावाचा इंग्रजी मध्ये अर्थ झाला पण त्यांना मराठी मध्ये एक मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता (ASHA) असे म्हणतात.
- मिशनची सुरुवात 2005 मध्ये झाली.
- हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) द्वारे नियोजित केलेला कार्यक्रम आहे. त्यांच्याअंतर्गत हा भारताच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) चा एक भाग आहे. या मध्ये ह्या आशा एक सामुदायिक आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतात.
- या कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणीचे लक्ष्य 2012 ठेवण्यात आले होते.
- या योजनेअतंर्गत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता (ASHA) ची कल्पना उपेक्षित समुदायांना आरोग्य सेवा प्रणालीशी जोडण्याची होती.
- भारतातील “प्रत्येक गावात एक आशा” असावी हे लक्ष्य होते.
आशा वर्कर्स (ASHA) – ची आदर्श संख्या
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय त्यांच्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या या योजनेमुळे भारतामध्ये आशा वर्करची संख्या मोठ्या प्रमाणत वाढली.
- या कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणीचे लक्ष्य 2012 ठेवण्यात आले होते.
- त्यामुळे जुलै 2013 मध्ये आशांची संख्या 8,70,089 असल्याचे नोंदवले गेले.
- पुढे 2018 मध्ये ही संख्या 9,39,978 झाली.
- आता संध्या भारतामध्ये ASHA ची आदर्श संख्या 10,22,265 आहे.
आशा वर्कर्स (ASHA) – Link Official
राज्यात किती आशा वर्कर्स (ASHA) आहेत?
- आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये राज्यभरात साधारण 70 हजार आशा स्वयंसेवक कार्यरत आहेत.
- आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1 हजार लोकसंख्येमागे 1 आशा स्वयंसेवक नियुक्त आहे तर
- बिगर आदिवासी जिल्ह्यात 1500 लोकसंख्येमागे 1 आशा स्वयंसेवक नियुक्त आहे.
- आदिवासी क्षेत्रात 9,523 आशा स्वयंसेवक आरोग्य सेवा देत आहेत. तर
- बिगर आदिवासी जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक आशा स्वयंसेवक काम करत आहेत.
आशा वर्कर्स (ASHA) – त्यांना त्यांच्या कामाबद्दल मिळालेली उपलब्धी
- कोव्हीड-19च्या काळात केलेल्या कामाची दखल घेत WHO ने 2022 मध्ये ग्लोबल हेल्थ लीडर अवॉर्ड 2022 साठी भारतातल्या आशा वर्कर्सची निवड केली आहे. 10 लाखांपेक्षा महिला भारतातल्या ग्रामीण भागतल्या आरोग्यसाठी दररोज काम करत आहेत. त्या सर्वांचा या माधम्यातून सन्मान करण्यात आला आहे.
आशा वर्कर्स (ASHA) – स्वयंसेवकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काय आहेत?
आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा की आशा वर्कर्स काय काम करतात. तर आपण खालील दिलेल्या मुद्यावरून समजून घेऊ…
- आशा स्वयंसेवकाचे काम साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे.
- कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे,
- माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे),
- जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे,
- किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्या आशा स्वयंसेवकांवर आहेत.
- कोरोना साथीमध्ये त्यांनी स्वता: घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का?
- वयोवृद्ध लोकं कोणत्या घरात राहतात, त्यांना कोणते आजार आहेत का? याचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं,
- होम क्वारंटाईन असलेला कोरोना रूग्णाला कोणती लक्षणं दिसतायेत याबाबत दररोज माहिती घेणं,
- आरोग्य केंद्रावर लोकांना तपासणीसाठी आणणे,
- लसीकरणासाठी जनजागृती करणे,
- लसीकरण केंद्रांवर मदतीचे काम करणे ही कामे आशा स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेली आहे.
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशांवर सोपवण्यात आली होती.
आशा वर्कर्स (ASHA ) – आशा स्वयंसेवकाचं शिक्षण आणि प्रशिक्षण काय असतं?
जर तुम्हाला आशा स्वयंसेवका बनायचे असेल, तर खालील दिलेले निकष पूर्ण असावेत.
- तुम्हाला आदिवासी भागामध्ये काम करायचे असेल तर तुमचं शिक्षण हे आठवी पूर्ण (Pass) पाहिजे. आणि
- बिगर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशा चे हे शिक्षण दहावी पूर्ण झालेलं असावं अशी शासनाची अट आहे.
- आशा स्वयंसेविका ही विवाहित (लग्न झालेली) स्त्री असावी.
- त्याचबरोबर ती 20 ते 45 वयोगटातील असावी.
- ती महिला त्याच गावची रहिवासी असावी.
- या वर्गातील ज्या उमेदवारांकडून अर्ज केले जातात त्यातून तीन उमेदवारांची नावं ही ग्रामसभेला सुचित केली जातात आणि ग्रामसभेकडून या तीन उमेदवारांपैकी एका आशा स्वयंसेवकांची निवड केली जाते.
- ग्रामसभेद्वारे आशा स्वयंसेवकांची निवड झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारीकडून आशा स्वयंसेविका ला नियुक्ती पत्र देण्यात येते.
- त्यानंतर आशा स्वयंसेविकांना 23 दिवस प्रशिक्षण दिलं जातं.
आशा वर्कर्स (ASHA) – आशा स्वयंसेवकांनच पगार / मानधन
- महाराष्ट्र राज्य आशा कृती समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील हे आहे. “आशा स्वयंसेवकांना आरोग्य यंत्रणेशी निगडीत 72 कामे कामे करावी लागतात. यावर त्यांना आधारित 2000 ते 3000 मोबदला मिळतो. केंद्र सरकारने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता महिन्याचे 1000 रुपये.
अधिक माहिती :- कृषी सहाय्यक कसे बनावे
आशा वर्कर्स (ASHA) – आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तक यांच्या मागण्या
- आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी.
- शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.
- त्याचबरोबर त्यांना दरमहा 18 हजार रुपये इतके मानधन देण्यात यावं.
तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या Youtube channel वर पाहू शकता.
FAQ
Quetion – आशा वर्करचे काम काय आहे?
Answer – आशा वर्कर चे खूप कामे आहे त्यातील मुख्य काम हे शासनाच्या आरोग्य संबंधित योजनेची अंमलबजावणी करणे.
Quetion – आशा वर्करसाठी किमान पात्रता काय आहे?
Answer – तुम्हाला आदिवासी भागामध्ये काम करायचे असेल तर तुमचं शिक्षण हे आठवी पूर्ण (Pass) पाहिजे. आणि बिगर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशांचे शिक्षण हे दहावी पूर्ण झालेलं असावं अशी शासनाची अट आहे.
Quetion – आशा वर्कर्सचे पेमेंट काय आहे?
Answer – आशा वर्कर्सची मासिक 6000 ते 10000 पर्यंत वाढ केली आहे.
5 thoughts on “आशा वर्कर्स (ASHA) सर्व माहिती मराठी मध्ये Free 2024”