कलेक्टर हा शब्द जरी ऐकला तर अंगाला काटा येतो. आणि लहान पणी आपण कोठे काही मोठे कार्यक्रमाला गेलो असेल तर तेथे प्रमुख पाहुणे म्हणून कलेक्टर साहिबाना बोलावलेले असते ते आपण पाहतो. आणि आपले कोठे भांडण झाले किंवा आपल्याला कोणी बोलेले तर पटकन आपल्याला कोणी बोलून जाते की कुठला कलेक्टर आहे का ? तर तेव्हा आपल्याला या शब्दची किंमत माहिती नसते पण आपण हा शब्द वारंवार ऐकलेला असतो. तरी आपण या लेखामध्ये कलेक्टर कसे बनतात? त्यासाठी कोणते शिक्षण लागते? तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला कलेक्टर बनायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
कलेक्टर म्हणजे काय?
- UPSC मार्फत घेतली जाणारी हि एक परीक्षा आहे. त्यामध्ये तुम्ही पास झाले तर तुम्हाला (भारतीय प्रशासक सेवा) IAS हे पद मिळते, त्यालाच आपण कलेक्टर म्हणजेच जिल्हाधिकारी म्हणतो.
कलेक्टर कोण असतो?
कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवा मधील अधिकारी असतो. हा व्यक्ती जिल्ह्याचा प्रमुख असतो. म्हणजे जिल्हयातील संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी त्यांचेकडे असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारीही असतात.
हे वाचायला आवडेल : 1 ते 10 साठी कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात?
कलेक्टर शब्दाची अर्थ आणि निर्मिती
- हा शब्द District म्हणजे जिल्हा आणि Collector म्हणजे गोळा करणारा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. इंग्रजीमध्ये – Collector, मराठीमध्ये- जिल्हाधिकारी, हिंदीमध्ये-जिलाधिकारी, तमिळमध्ये – ஆட்சியர், तेलगुमध्ये- కలెక్టర్ असे म्हणतात.
कलेक्टर पदाचा इतिहास
- जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने हे पद १७७२ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांनी निर्माण केले. या पदाचे महत्त्व वाढवण्यासाठी ब्रिटिश सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली. स्वातंत्र् नंतरच्या काळात जिल्हाधिकारी पदाचा अधिकार व त्याच्या जबाबदारीत बदल करण्यात आले. जनकल्याणाच्या संबंधित अनेक कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
UPSC काय आहे?
- UPSC (union public service commission संघ लोकसेवा आयोग)
- स्थापना: १ ऑक्टोबर १९२६ मध्ये.
- हि एक संवैधानिक स्वतंत्र संस्था आहे.
- यामध्ये IAS, IPS, IFS असे विविध अधिकारी निवडले जातात.
- क्लास A क्लास B चे कर्मचारी भरती करण्यासाठी परीक्षा आयोजित करणे.
- भारतात सर्वात कठीण परीक्षामध्ये UPSC चे नाव येते.
- यामध्ये ऐकून 24 पदांसाठी भरती केल्या जाते.
UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा
- CSE (Civil Service Examination)
- ESE(Engineering Service Examination)
- CDSE(Combined Defense Service Exam)
- NDA(National Defense Academy Examination)
UPSC मध्ये दोन प्रकारच्या services ची भरती केली जाते.
All India Civil Services – अखिल भारतीय सेवा· Indian Administrative Service – (IAS) · Indian Police Service – (IPS) · Indian Forest Service – (IFS) |
Group A Civil Services.
- Indian Foreign Service – (IFS)
- Indian Civil Accounts Service – (ICAS)
- Indian Audit and Accounts Service – (IAAS)
- 10+ and more Other
Group B Civil Services.
- Central Secretariat Service (CSS)
- Railway Board Secretariat Service – (RBSS)
- Indian Foreign Service – (IFS ‘B’)
- Armed Forces Headquarters Civil Service
- Customs’ Appraisers Service
- Delhi and Andaman & Nicobar Islands Civil Service (DANICS)
- Goa, Daman and Diu Police Service
- Posts of Assistant Commandant
- Post of Deputy Superintendents of Police in the Central Bureau of Investigation (CBI).
UPSC परीक्षेसाठी पात्रता
- शिक्षण : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी असावी
- मुक्त विद्यापिठातील पदवीही ग्राह्य मानली जाते
- Technical service साठी त्यांच्या क्षेत्राशी संबंधित पदवी असावी.
Age Limit (वयोमर्यादा)
Cast (जात) | कमाल वयोमर्यादा | किती वेळा देता येते |
General | 32 | 6 attempt |
OBC | 35 | 9 attempt |
SC / ST | 37 | 11 attempt |
UPSC भरती प्रक्रिया
- UPSC Prelims ( पूर्व परीक्षा)
- UPSC Mains (मुख्य परीक्षा)
- UPSC Interview (मुलाखत)
UPSC Prelims पूर्व परीक्षेचे स्वरूप
पेपर | प्रश्न संख्या | कालावधी (time) | एकूण गुण |
पेपर 1: सामान्य अभ्यास(GS 1) | 100 | 2 तास | 200 |
पेपर 2: CSAT | 80 | 2 तास | 200 |
UPSC Mains मुख्य परीक्षेचे स्वरूप
पेपर | विषय | कालावधी | एकूण गुण |
पेपर A | Compulsory indian Language | 3 तास | 300 |
पेपर B | English | 3 तास | 300 |
पेपर – 1 | Essay | 3 तास | 250 |
पेपर -2 | General studies – I | 3 तास | 250 |
पेपर -3 | General studies – II | 3 तास | 250 |
पेपर -4 | General studies – III | 3 तास | 250 |
पेपर -5 | General studies – IV | 3 तास | 250 |
पेपर -6 | Optional – I | 3 तास | 250 |
पेपर – 7 | Optional –II | 3 तास | 250 |
Total | 1750 |
UPSC Interview (मुलाखत)
- UPSC परीक्षेतील सर्वात शेवटचा टप्पा हा Interview (मुलाखत) असतो.
- मुलाखत 275 मार्काची असते.
- मुलाखत चे 275 मार्क्स व मुख्य परीक्षेचे 1750 असे मिळून 2025 ची UPSC परीक्षा असते.
- 2025 मार्क ग्राह्य धरून उमेदवारांना पदे दिली जातात.
- या तीनही पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात.
- जर कोणत्याही परीक्षेत नापास झाला तर त्याला परत पहिल्यापासून म्हणजे पूर्व पासून सुरु करावे लागते.
कलेक्टर ची निवड कोण करते?
परीक्षा घेण्याचे आणि योग्य उमेद्वार सरकार मध्ये आणण्याचे काम संघ लोकसेवा आयोग(UPSC) करत असते. नंतर जिल्हाधिकारी यांना कोठे नियुक्ती करायचे हा अधिकार राज्य शासन आणि केंद्रशासनाचा असतो. UPSC कडून निवड झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती, वेतन, बढती, सेवा-निवृत्ती बाबत केंद्र सरकारचे नियम लागू होतात. राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी असेल तर त्याचा पगार आणि भत्ते हे राज्य शासन करत असते. भारत प्रशासन सेवेतून आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्ष तर बढती मिळून जिल्हाधिकारी बनलेल्या ५८ व्या राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होतात.
कलेक्टर याची ट्रेनिंग
- जर तुम्ही ही परीक्षा पास झाला तर तुम्हाला पुढील ट्रेनिंग साठी पाठवले जाते. जिल्हाधिकारी यांचे प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी मसूरी येथे होते.
UPSC चा पगार किती आहे?
- IAS अधिकाऱ्यासाठी UPSC पगार INR 56,100 आहे. या स्तरावर, IAS अधिकारी हा एक अंडर-सेक्रेटरी असतो ज्याला 5400 ग्रेड पे मिळतो. IAS आणि IPS साठी सुरुवातीचा पगार सारखाच असतो, IAS पगार IPS च्या पगारापेक्षा जास्त काळ वाढतो.
जिल्हाधिकारी यांची कार्य आणि कर्तव्ये
जिल्हाधिकारी हे केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अतंर्गत काम करतो. जिल्हाधिकारी हे त्याच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राचा विकास करणे व नवे कायदे जिल्ह्यात लागू करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य कर्तव्य होय त्याचबरोबर विविध योजनांचे प्रतिनिधित्व देखील ते करतात. महसूल,निवडणूक,आपत्ती व्यवस्थापन. इ कामाचे नियंत्रक म्हणून कामे पार पाडतात
FAQs
1) IAS चा अर्थ काय?
Answer – IAS चा पूर्ण फॉर्म Indian Administrative Service भारतीय प्रशासकीय सेवा आहे.
2) IAS साठी सर्वोत्तम कॅडर कोणते आहे?
Answer – गृह केडर जे IAS साठी सर्वोत्कृष्ट केडर मानला जातो, जर त्यांनी लक्षणीय उच्च पद प्राप्त केले असेल तर त्याला त्याचे स्वताचे राज्य नोकरी साठी मिळू शकते.
3) UPSC मध्ये पात्रता काय आहे?
Answer – कोणताही पदवीधर UPSC CSE परीक्षेतील कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकतो. अधिकृत अधिसूचनेनुसार सामान्य श्रेणीसाठी UPSC वयोमर्यादा परीक्षेच्या वर्षाच्या 1 ऑगस्ट रोजी 21 ते 32 वर्षे आहे.
4) UPSC सर्वोच्च पद कोणते आहे?
Answer – कॅबिनेट सचिव हे फेडरल सरकारमधील IAS मध्ये उपलब्ध असलेले सर्वोच्च UPSC पद आहे. कॅबिनेट सचिव हे भारतातील सर्वोच्च अधिकारी आहेत आणि ते भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये सर्वोच्च पदावर विराजमान आहेत.
5) दरवर्षी किती IAS निवडले जातात?
Answer – 180 अधिकारी. UPSC द्वारे दरवर्षी निवडलेल्या IAS अधिका-यांची संख्या निश्चित केली जाते.
6) IAS चा बॉस कोण आहे?
Answer – मुख्य सचिव हे राज्य नागरी सेवा मंडळ, राज्य सचिवालय, राज्य संवर्ग भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्य सरकारच्या व्यवसायाच्या नियमांनुसार सर्व नागरी सेवांचे पदसिद्ध प्रमुख आहेत.
7) भारतात किती IAS आहेत?
Answer – 2022 च्या UPSC निकालांनुसार भारतात 3511 IAS अधिकारी आहेत, जरी भारतात IAS अधिकार्यांसाठी एकूण 4926 कॅडर संख्या आहे.
8) IAS ला कोण निलंबित करू शकते?
Answer – केवळ भारताचे राष्ट्रपती आयएएस अधिकार्यांना त्यांच्या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर निलंबित किंवा बडतर्फ करू शकतात.
3 thoughts on “कलेक्टर बनायचे असेल तर हे माहित पाहिजे? Free 2024”