मिंत्रानो सर्वांच्याच परिचयातील असे हे पद म्हणजे ग्रामसेवक, Gram Sevak – ग्रामसेवक व्हायचं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात. तुमच्यापैकी कोणी या पदाची तयारी करत असेल, किंवा तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्तीला हे पद मिळवायचे असेल. मिंत्रानो खूप असे मुले असतात कि त्यांना या पदाबद्दल माहिती नसते, किंवा खूप कमी प्रमाणत या पदाबद्दल माहिती असते. आणि काही ना तर हेच माहिती नसेल कि हे पद काय आहे आणि त्याचा कुठे उपयोग होतो आणि काही महाशय असे पण आहे कि याची निवडणूक होते कि, अभ्यास करून हे पद मिळवावे लागते हेच माहिती नसते.
तर आपण या मध्ये ग्रामसेवक कसे बनावे, त्याची पात्रता, त्या पदासाठीचा अभ्यासक्रम, पेपर कसा असतो, किती मार्क लागतात, त्याची कार्य, त्यांची प्रशिक्षण केंद्र (Training Center कुठे आहे, अश्याच पडलेल्या प्रश्नाची उत्तरे या लेखामध्ये पाहणार आहोत.
Gram Sevak – ग्रामसेवक म्हणजे काय? या पदाबद्दल माहिती
ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. या पदाला प्रत्येक राज्यात वेगवेगळी नावे आहेत, महाराष्ट्रामध्ये या पदाच्या व्यक्ती ला सचिव असे म्हणतात. गावातील विकासकामाची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते. ग्रामसेवक हा ग्राम विकासासाठी झालेल्या खर्चाचा हिशेब ठेवतो आणि त्याचा अहवाल शासनाला देतो. ग्रामसेवकाची निवड ही जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. ग्रामसेवक यांची निवड ५०% ग्रामरोजगार सेवक मधून आणि ५०% जिल्हा परिषद सरळसेवा परिक्षेमधून केली जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक किंवा विशिष्ट परिस्थितीत एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी एकाच ग्रामसेवकाची नेमणूक करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 60 मध्ये देण्यात आला आहे.
Gram Sevak – ग्रामसेवक भरती 2023 पात्रता
ग्रामसेवक परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे
- कोणत्याही शाखेतून 12 पास 12 ला किमान 60 % मार्क असणे आवश्यक
- त्यानंतर तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.
- उदाहरण जसे कि तुम्ही – MCVC शाखेतून 12 वी पास / इंजिनिअरिंग or डिप्लोमा or समाज कल्याण पदवी / Agree / Btech यापैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे
- MS – CIT Course केलेला असावा
- वयोमर्यादा : 18–38 वर्ष आहे महाराष्ट्र सरकार
- वय सवलत : OBC- 3 वर्ष & SC/ST – 5 वर्ष
- तो महराष्ट्राचा रहिवासी असावा
Gram Sevak – ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप 2023
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 15 | 30 | 02 तास |
2 | इंग्रजी भाषा | 15 | 30 | |
3 | सामान्य ज्ञान | 15 | 30 | |
4 | बौद्धिक चाचणी | 15 | 30 | |
5 | तांत्रिक विषय | 40 | 80 | |
एकूण | 100 | 200 |
- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल
- तांत्रिक विषयचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे. आणि बाकी सर्व विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे.
- या परीक्षेसाठी Negative Marking नाही
- मुलाखत – Interview , शारीरिक चाचणी – Physical Test ही पेपर पास झाल्यावर घेतल्या जाणारे पुढील टप्पे आहे.
Gram Sevak – ग्रामसेवक भरती परीक्षेचे अभ्यासक्रम
Gram Sevak syllabus मध्ये मुख्य विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक (कृषी) विषय आहे.
मराठी भाषा :-
- सर्वसामान्य शब्दसंग्रह (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
- वाक्यरचना (वाक्र्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
- व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार)
- म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
- उताऱ्यावरील प्रश्न
इंग्रजी भाषा :-
- General Vocabulary (Synonyms and Antonyms)
- Sentence structure (Types or Sentence, Error Detection)
- Grammar (Parts of Speech, Subject Verb Agreement, Tense, Direct Indirect Speech, Voice)
- Use of Idioms and Phrases and their meaning
- Comprehension of passage
बौद्धिक चाचणी :-
- सामान्य बुद्धीमापन व आकलन
- तर्क आधारित प्रश्न
- अंकगणित आधारित प्रश्न
सामान्य ज्ञान :-
- आधुनिक भारताचा इतिहास
- भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
- भारतीय अर्थव्यवस्था
- ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्ये
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
- कृषि आणि ग्रामीण विकास
- संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास,
- हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
तांत्रिक विषय (कृषी) :-
- कृषी मुलतत्वे
- पीक उत्पादन तंत्रज्ञान
- फलोत्पादन
- पीक संरक्षण
- कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती
- कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान
- सहकार पतपुरवठा
- पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग
- सेंद्रिय शेती
- कृषी आधारित उद्योग
- मृद संधारण, जल संधारण व जल व्यवस्थापन
- पर्यावरणीय बदल
Gram Sevak – ग्रामसेवकाची निवड व नेमणूक
ग्रामसेवकाची निवड ही जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जिल्हा निवड समितीमार्फत स्पर्धा परीक्षेतून केली जाते. ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला आहे. गावाचा विस्तार गावची एकूण लोकसंख्या आणि ग्रामपंचायतची प्राप्ती या बाबीचा विचार करून जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी एका ग्रामसेवकांमध्ये किती ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपवायची हे निर्धारित करतात. याकरता वरील प्रमाणे परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक म्हणून नेमणूक केली जाते.
Gram Sevak – ग्रामसेवकावर नियंत्रण / बढती / रजा
- राजकीय नियंत्रण – सरपंच
- प्रत्यक्ष नियंत्रण – गटविकास अधिकारी
- अप्रत्यक्ष नियंत्रण- ZP – CEO(मुख्य कार्यकारी अधिकारी)
- बदली – ZP – CEO(मुख्य कार्यकारी अधिकारी)
- निलंबित – ZP – CEO(मुख्य कार्यकारी अधिकारी)
- निवृत्तीचे वय – निवृतीपासून वयाच्या 60 वर्षापर्यंत
- किरकोळ रजा – ZP – BDO(गटविकास अधिकारी)
- अर्जित रजा – ZP – CEO मुख्य कार्यकारी अधिकारी
- राजीनामा कोणाकडे – ZP – CEO मुख्य कार्यकारी अधिकारी
- ग्रामसेवकाला वेतन – जिल्हा निधीतून
Gram Sevak–Salary ग्रामसेवकाचे वेतन
महाराष्ट्र शासनाने ग्रामसेवकांचे वेतन 5200 ते 20200 + ग्रेड पे 2400 पर्यंत आहे आणि 12 वर्षाच्या सेवेनंतर ग्रेड पे 3500 पर्यंत वाढवला जातो.
Gram Sevak–Traning Centre प्रशिक्षण केंद्र
- जिल्हा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र
- अमरावती अमरावती
- परभणी परभणी
- बुलढाणा बुलढाणा
- जालना जालना
- कोल्हापूर गारगोटी
- चंद्रपूर सिंदेवाडी
- पुणे मांजरी – कोसबाड
Gram Sevak – कार्य आणि कर्तव्य
कर वसुली करणे, वसुलीतून गावविकासाची कामे करणे, ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल आणि हिशोब पंचायत समितीस व जिल्हा परिषदेला सादर करणे, पाणीपुरवठा करणे, साफ सफाई करणे, दिवा बत्ती करणे, जन्म नोद करणे, मर्त्युची नोद करणे, विवाह नोदणी करणे, ग्रामीण विकास, महानरेगा, स्वच्छ भारत मिशन, ग्राम सभा भरवणे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामे पार पाडतात, ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब ठेवणे, जैवविविधता समिती सचिव म्हणून कामकाज सांभाळणे, ग्रामनिधी ची संपूर्ण जबाबदारी सांभाळणे, जन माहिती अधिकारी म्हणून कार्य करणे, ग्रामस्थांना विविध, ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे, दाखले देणे, गावात विकासाची योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे विस्तार अधिकार्यांच्या सल्ल्याने शासकीय योजनेची माहिती देणे व अंमलबजावणी करणे, बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कार्य करणे.
-
विविध योजना राबविणे उदा.
- महानरेगा
- स्वच्छ भारत मिशन
- 14वा वित्त आयोग.
- प्रधान मंञी आवास योजना
- स्मार्ट गाव
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
#ग्रामसेवक पगार किती आहे ?
उत्तर – ग्रामसेवकांचे वेतन 5200 ते 20200 + ग्रेड पे 2400 पर्यंत आहे
#ग्रामसेवक भरती कधी होणार?
उत्तर – 2023 मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे