मित्रांनो आपण या लेखामध्ये ग्रामपंचायत ऑपरेटर सर्व माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही छोट्या गावामध्ये असाल किंवा मोठ्या लोकसंखेच्या गावामध्ये राहत असाल तर हा लेख तुमच्या साठी खूप महत्वाचा ठरणार आहे. कारण तुमच्या गावामध्ये कोणी ग्रामपंचायत ऑपरेटर नियुक्त झाला नसेल तर तुम्ही ती जागा (post) मिळू शकता. आणि त्या पदावर कोणी असेल तर त्यांची कामे आणि कर्तव्य तुम्हाला माहित असेल तर ती व्यक्ती ती कामे योग्य प्रकारे पार पडत नसेल तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकता, आणि तुम्हाला ही माहिती असायलाच पाहिजे.
कारण त्यांना मिळणारे वेतन आणि त्याचीकडे असलेली कामे ही तुमची आणि तुमच्या गावाच्या विकासासाठी हिताची असेल. आपण या मध्ये ग्रामपंचायत ऑपरेटर चा अर्थ आणि इतिहास, ग्रामपंचायत ऑपरेटर ची नोंदणी, ग्रामपंचायत ऑपरेटर ची पात्रता, ग्रामपंचायत ऑपरेटर चा पगार, ग्रामपंचायत ऑपरेटर ची कामे या सर्वाची माहिती पाहणार आहोत.
ग्रामपंचायत ऑपरेटर चा अर्थ
इंग्लिश- Gram Panchayat Computer Operator
मराठी – ग्रामपंचायत संगणक परिचालक
ग्रामपंचायत ऑपरेटर चा इतिहास
- महाराष्ट्र शासनाने 11 ऑगस्ट 2016 रोजी एक प्रकल्प राबवण्यात आला, त्या प्रकल्पामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचे योजना राबविण्यात आली होती.
- प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत मध्ये ऑनलाइन काम करण्याकरता ग्रामपंचायत ऑपरेटर निवडण्यासाठी ची प्रक्रिया अवलंबण्यात आली. सरकारी योजनेची सूचना गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सरकारी कामांची नोंद ऑनलाइन करण्यासाठी ग्रामपंचायत ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली.
- ग्रामपंचायत ऑपरेटर कोणताही प्रकारचा शासकीय नोकरदार नसून तो VLE (Village Leval Entrepreneur) गाव पातळी उद्योजक म्हणून ओळखला जातो
- या योजनेअंतर्गत प्रत्येक महाराष्ट्रातील गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले
- आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची जबाबदारी केंद्र शासनाच्या सीएससी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे देण्यात आली ही कंपनी त्यांच्याकडून नेमण्यात आलेल्या उमेदवाराला ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर म्हणून नेमणूक करते.
Gram Panchayat Operator Registration – नोंदणी
- https://mh.gov2egov.com/GeneralPages/HomeNew.aspx या पदासाठी ऑनलाइन अर्ज या साइटवरून करावा लागतो.
- त्यासाठी जागा रिक्त असणे गरजेचे आहे आणि ती रिक्त आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही या साइटवर जाऊन चेक करू शकता.
- प्रथम साइटवर जाऊन अर्ज करण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता.
ग्रामपंचायत ऑपरेटर पदासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- Resume (वैयक्तिक माहिती)
- शैक्षणिक कागदपत्रे
- एम एस सी आय टी (MS-CIT) प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- पॅन कार्ड
Grampanchayat Operator Qualification –
पात्रता
- Qualification : 10th pass + Typing speed 30 word per minute + computer course
- पात्रता : 10वी पास + टायपिंगचा वेग 30 शब्द प्रति मिनिट + संगणक अभ्यासक्रम
- Age Limit : 18 to 40 year (age relaxation as per govt rules)
- वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे (सरकारी नियमांनुसार वयात सूट)
Gram Panchayat Operator Salary
- ग्रामपंचायत ऑपरेटरला एका महिन्याचे ७००० रुपये मानधन दिल्या जातात
ग्रामपंचायत ऑपरेटर ची कामे
- दैनंदिन कामकाजाचे १ ते 33 नमुने Egram सॉफ्टवेअर मध्ये संगणकृत करणे
- जागेची नोंद करणे, गावकऱ्यांना विविध दाखले देणे.
- ग्रामपंचायत चे सूचना, अहवाल तयार करणे, मास्टर भरणे,
- ई पंचायत कार्यक्रमांतर्गत ई ग्राम स्वराज एप्लीकेशन मध्ये माहिती Update करणे.
- जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाबाबत आयोजित बैठक प्रशिक्षणास उपस्थित राहून ग्रामसेवक व सरपंच उपसरपंच यांना अवगत करणे
- ग्रामपंचायती द्वारे देण्यात येणारे १ ते 19 मधील दाखले प्रमाणपत्र जीआरसी संगणिकृत करणे व वितरित करणे
- आपले सरकार पोर्टल द्वारे ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणाऱ्या सेवा संगणकृत करणे व वितरित करणे
- राईट टू सर्विसेस ऍक्ट अंतर्गत येणाऱ्या सेवा ग्रामपंचायत स्तरावर वितरित करणे
- केंद्र चालक हा स्वतंत्र उद्योजक असल्याकारणाने पैसा कमावण्याकरता इतर व्यवसायिक सुविधा ग्रामविकास विभागाने पूर्व परवानगी दिलेल्या अथवा त्याच्याकडून पूर्व परवानगी घेऊन इतर विभागात ने दिलेली कामे करणे .
- ग्रामपंचायत विषयी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी इतर सेवा उपलब्ध करणे उदाहरण रेल्वे बस आरक्षण, मोबाईल डीएसटी रिचार्ज भरणे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट नोंदणी करणे,
- ग्रामपंचायत स्तरावर बँकिंग सेवा वितरित करणे ग्राम विमा, हप्ते भरणे, विमा वितरित करणे इत्यादी.
हे सुद्धा वाचा :- आशा वर्करचे काम काय आहे?
Read More : – Tally course
FAQ
Quation – gram panchayat operator qualification (ग्रामपंचायत ऑपरेटर पात्रता)
Answer – 10वी पास
Quation – ग्रामपंचायत ऑपरेटर ची कामे
Answer – १ ते 33 नमुने Egram सॉफ्टवेअर मध्ये संगणकृत करणे