Home Guard म्हणजेच गृहरक्षक दल हे एक स्वयंसेवी दल आहे. आपण सर्वांनी आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये पोलीसासारखी वर्दी घातलेले व्यक्ती पहालेले असेल. ते गावात जत्रा, सभा, गावातील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हे पोलीसासारखी वर्दी घातलेले व्यक्ती दिसतात. त्यांनाच Home Guard म्हणजेच गृहरक्षक म्हणतो. या पदाचा इतिहास, Home Guard बनण्यासाठी काय करावे लागते, त्याची शैक्षणिक पात्रता काय असते, वय किती लागते, याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात पाहू.
Meaning – अर्थ
- Home Guards – गृहरक्षक दल
History – इतिहास
- गृहरक्षक दल हे एक स्वयंसेवी दल आहे, ज्याची स्थापना डिसेंबर 1946 मध्ये भारतात प्रथमतः नागरी अशांतता आणि जातीय दंगलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी करण्यात आली होती.
- या उद्देशाने मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली. ती प्रारंभी मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहरात स्थापन झाली. हिलाच पुढे होमगार्ड वा गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले.
- त्यानुसार तिची अंमलबजावणी गृहसंरक्षणाच्या नावाखाली न्यू सिव्हिल डिफेन्स ॲक्ट-१९६८ अनुसार त्याची इतर राज्यांतून निर्मिती झाली. परिणामी मुंबई प्रांत-महाराष्ट्राव्यतिरिक्त प. बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात इ. राज्यांमध्ये गृहरक्षक दलाची स्थापना होऊन ते कार्यरत झाले. ही संघटना केरळ वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहे. देशातील होमगार्ड्सची एकूण संख्या 5,73,793 आहे
- होमगार्ड दोन प्रकारचे असतात – ग्रामीण आणि शहरी. सीमावर्ती राज्यांमध्ये, (बॉर्डर विंग होम गार्ड्स (BWHG) Bns.) उभारण्यात आले आहे, जे सीमा सुरक्षा दलाचे सहाय्यक म्हणून काम करतात..
- सीमावर्ती राज्यांमध्ये पंधरा बॉर्डर विंग होमगार्ड (BWHG) बटालियन तयार करण्यात आल्या आहेत. पंजाब (6 Bns.), राजस्थान (4 Bns.), गुजरात (2 Bns.) आणि मेघालय, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालसाठी प्रत्येकी एक बटालियन आंतरराष्ट्रीय सीमेवर/किनारी भागात घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला सहाय्यक म्हणून काम करते. , बाह्य आक्रमणाच्या वेळी असुरक्षित भागात संवादाच्या ओळींचे रक्षण करणे.
Home Guards – ध्वज आणि ध्वजचिन्ह
- महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाला स्वतःची ओळख, वेगळेपण व स्थान प्राप्त व्हावे, या उद्देशाने राज्याच्या गृहरक्षक दलाला ध्वज आणि ध्वजचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार लॉरेल फुलांच्या माळेने वेष्टित असे कबुतर हे महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाचे ध्वजचिन्ह असून ते फिकट निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी सोनेरी धाग्याने विणलेले आहे.
Home Guards – Post पदे
- गृहरक्षक दलांतर्गत पद व जबाबदारीच्या विभागणीच्या दृष्टीने राज्यात गृहरक्षक-महासमादेशक, जिल्हा समादेशक, जिल्हा वरिष्ठ दलसंभाग नायक, बटालियन नायक, दलसंभाग नायक, द्वितीय समादेशक, कंपनी नायक, वरिष्ठ पलटण नायक, पलटण नायक, रेजिमेंटल सार्जंट मेजर, रेजिमेंटल सामग्री प्रबंधक सार्जंट, कंपनी सार्जंट मेजर, कंपनी सामग्री प्रबंधक सार्जंट, उप-विभाग नाईक, साहाय्यक उप-विभाग नाईक इ. पदांची त्यांची कार्ये आणि जबाबदाऱ्यांसह रचना करण्यात आली आहे.
Home Guards – Committees समित्या
- गृहरक्षक दलाच्या कामाचे विशिष्ट कालावधीनंतर त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी व संघटनेचे काम निश्चित उद्दिष्टांनुसार व कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य स्तरावर सल्लागार समित्या नेमल्या आहेत.
- यांपैकी राज्य स्तरावरील मध्यवर्ती सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री वा गृहमंत्री आणि सदस्य म्हणून राज्याचे अर्थमंत्री, मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महानिरीक्षक, राज्य गृहरक्षक दलाचे महासमादेशक व चार अशासकीय व्यक्ती सदस्य म्हणून काम करीत असतात. मध्यवर्ती सल्लागार समितीचे सचिव म्हणून राज्य गृहरक्षक दलाचे महासमादेशक काम करीत असतात.
- गृहरक्षक दलाच्या जिल्हास्तरीय जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात, तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक व त्याशिवाय राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ३ ते ५ अशासकीय व्यक्ती या समितीच्या सदस्य असतात. जिल्हा सल्लागार समितीचे सचिव म्हणून गृहरक्षक दलाचे संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समादेशक काम पाहतात.
Home Guards – Contribution योगदान
- महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मिळून सध्या सु. ५३ हजार गृहरक्षक कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी मदत केली. शिवाय लातूर व किल्लारीचा भूकंप, २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला, मुंबईतील २६ जुलै २००५ चा महापूर, पुणे जिल्ह्यातील माळीण गावची ३० जुलै २०१४ ची दुर्घटना इ. आपत्कालीन प्रसंगी गृहरक्षक दलाने मदत केली असून राज्यातील धार्मिक उत्सव, सार्वजनिक निवडणुका इत्यादींच्या यशस्वी व शांततापूर्ण संचालनासाठी नेहमीच आपले योगदान दिले आहे.
Home Guards – Eligibility पात्रता
- मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे अवश्यक. उच्च शिक्षित असेल तर प्राधान्य मिळते.
- १८ ते ५० वयोगटातील शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.
- गृहरक्षक दलात सामील होण्यासाठी पुरुष उमेदवारांची उंची कमीत कमी १६५ सेंमी., वजन किमान ५० किग्रॅ., छाती सामान्यपणे ८० सेंमी. व फुगवून ८५ सेंमी. आणि दृष्टी निकोप असणे आवश्यक.
- गृहरक्षक दलातील निवड ही मुख्यतः पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या निवड-निकषांवर आधारित असते. त्यामुळे स्त्री-गृहरक्षकांची निवड त्या नियमानुसार होते.
- निवड झालेल्या उमेदवारांना गृहरक्षक म्हणून नेमण्यात येऊन त्यांना स्थानिक स्तरावर विशिष्ट पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात येते.
- गृहरक्षकांचे निवृत्तीचे वय साधारणतः ५५ वर्षे असते.
- जे गृहरक्षक-स्वयंसेवक तीन वर्षे गृहरक्षक म्हणून कामगिरी बजावतात अशांना पोलीस दल, अग्निशमन दल, राज्य राखीव दल इ. मधील निवडप्रसंगी पाच टक्के आरक्षणाचा नियम असून त्याचा फायदा प्रशिक्षित गृहरक्षक वेळोवेळी घेत असतात.
Home Guards – Training प्रशिक्षण
- प्रशिक्षणामध्ये गृहरक्षकांना प्राथमिक कवायत, सशस्त्र कवायत, निशाणबाजी, शस्त्रास्त्रे-प्रशिक्षण, प्राथमिक कायदा, जमाव नियंत्रण, प्रथमोपचार, नैसर्गिक आपत्ती निवारण, अग्निशमन प्रशिक्षण इत्यादींचा समावेश असतो.
- महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे मुख्यालय घाटकोपर, मुंबई येथे असून त्या ठिकाणी गृहरक्षकांना तीन आठवडे कालावधीचे नागरी आकस्मिक सहायता, टेहळणी करणे व माहिती देणे, दळणवळण, वाहतूक नियंत्रण, अग्निशमन व आग नियंत्रण, आग विझविण्याचा प्रगत अभ्यासक्रम, आपद्ग्रस्तांना मदत आणि सुटका, आकस्मिक दुर्घटनेच्या प्रसंगी मदत आणि कारवाई, जखमींना प्रथमोपचार, नि:शस्त्र संरक्षक कारवाई, उजळणी प्रशिक्षण, काल्पनिक दुर्घटना स्थिती व तीवर नियंत्रण इ. स्वरूपाचे योजनाबद्ध प्रशिक्षण देण्यात येते.
- गृहरक्षक दलांना मध्यवर्ती नागरी संघटना केंद्रांकडून प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून बनविलेल्या ३०३ ली एन्फील्ड रायफली, स्टेन अँड बेन गन्स देण्यात येतात.
Home Guards – कार्ये
- राज्यातील धार्मिक उत्सव, सार्वजनिक निवडणुका शांतता टिकून ठेवणे.
- पोलीस दलाला साहाय्यक म्हणून काम करणे.
- सर्वानिक कार्यक्रम सुव्यवस्था राखणे, शांतता टिकून ठेवणे.
- अपघात व संकटाच्या वेळी गरजूंना प्रथमोपचार व रक्त देणे.
- रुग्णवाहिकेची सेवा पुरविणे वगैरे कामे करणे.
- राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे.
- नैसर्गिक संकट व विमानहल्ला इत्यादी आपत्तींच्या प्रसंगी आपत्ती निवारणाच्या कामी मदत करणे.
- समाजकल्याण विषयक कामांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारला मदत करणे.
- संपकाळात किंवा अन्य कारणाने दैनंदिन व रोजचे कामकाज बंद पडले असता विविध आवश्यक सेवा चालू ठेवण्याच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रण, दळणवळण-संवाद, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास मदत करणे.
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला मदत करणे. इत्यादी.
Home Guards – आधुनिकीकरणांतर्गत
होमगार्ड्स संघटनेची भूमिका, वाढ, प्रशिक्षण, सुसज्ज, स्थापना आणि इतर महत्त्वाच्या बाबींच्या संदर्भात गृह मंत्रालय धोरण तयार करते. होमगार्ड्सवरील खर्च साधारणपणे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ५०% च्या प्रमाणात वाटून घेतला जातो.
होमगार्ड्सच्या आधुनिकीकरणांतर्गत, प्रत्येक जिल्हा होमगार्ड कार्यालयात होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे बांधकाम 2003 पासून केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून केले जात आहे. अमरावती, धुळे, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद या जिल्हा प्रशिक्षण केंद्रांचे बांधकाम , रायगड, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, चंद्रपूर, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद आणि पुणे यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सिंधुदुर्ग आणि सातारा येथे जिल्हा प्रशिक्षण केंद्रासाठी इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी प्रशिक्षण केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. होमगार्ड्सची मानक आणि गुणात्मक कार्यक्षमता सुधारण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात.
हे ही वाचायला आवडेल : - पंडित कसे बनावे
FAQs
1) होमगार्डचा सर्वाधिक पगार किती आहे?
- होमगार्डसाठी कमाल वार्षिक भरपाई ₹5 लाख (₹45.8k प्रति महिना) आहे.
2) होमगार्डचे कर्तव्य काय?
- अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी पोलिसांचे सहाय्यक दल म्हणून काम करणे, हवाई हल्ला, आग, चक्रीवादळ, भूकंप, साथीच्या आजारासारख्या कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत समुदायाला मदत करणे, देखभाल करण्यात मदत करणे.
3) होमगार्ड कोणी सुरू केले?
- ऑक्टोबर 1939 पासून ‘होम डिफेन्स फोर्स’च्या निर्मितीसाठी सुधारित योजना आखल्या होत्या, तेव्हा पहिले लॉर्ड विन्स्टन चर्चिल यांनी होमगार्ड ची स्थापना केली.