NTSE Exam Information In Marathi NTSE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती ते बी मराठीत | Free 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये NTSE Exam Information In Marathi याबद्दल जाणून घेणार आहोत. ही एक परीक्षा आहे जी टॅलेंट सर्च परीक्षा म्हणून ओळखली जाते. इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या मध्ये आपण एन.टी.एस.इ. चा अर्थ , एन.टी.एस.इ. चा इतिहास, एन.टी.एस.इ. चे टप्पे, एनटीएससी ची पात्रता, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीची सामान्य आवश्यकता, शिष्यवृत्तीचा तपशिल, अभ्यासक्रम, पेपर ठिकाण आणि बरेच काही माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

NTSE Exam Information In Marathi

NTSE Meaning – एन.टी.एस.इ. चा अर्थ

  • National Talent Search Examination (NTSE) –
  • राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा ही सीबीएससी बोर्ड द्वारे घेतली जाणारी नॅशनल लेव्हल स्कॉलरशिप एक्झाम आहे.

NTSE History – एन.टी.एस.इ. चा इतिहास

भारत सरकारने 1961 मध्ये गुणात्मकता व देशातील शालेय शिक्षणात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ची स्थापना केली.

या दिशेने अनेक कार्यक्रम आयोजित केले. असाच एक कार्यक्रम ओळखायचा होता. जो हुशार विद्यार्थ्यांची निवड करेल. त्या साठी सन 1963 मध्ये राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा योजना (National Talent Search Examination – NTSE) हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हुशार विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे हे उद्देश ठेवण्यात आले. सुरुवातीला या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासित प्रदेश दिल्लीपुरती मर्यादित होती. ज्यामध्ये फक्त इयत्ता दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. सन 1964 मध्ये ही योजना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारित करण्यात आली.

NTSE ही इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा आहे. ही अशी परीक्षा आहे, जी प्रामुख्याने दोन टप्प्यात घेतली जाते. एनटीएसई-प्रथम नोव्हेंबरमध्ये तर द्वितीय मे महिन्यात होते.

 

NTSE चे टप्पे:

ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. त्यात पहिले म्हणजे Stage-1 (State Level) ही राज्याद्वारे घेतली जाते. आणि दुसरे म्हणजे Stage 2 (National Level) ही नॅशनल लेव्हल एक्झाम घेतली जाते. ही राष्ट्रीय स्थानावर NCERT म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारे घेतली जाते.

  • NTSE Stage 1 – (State Level Exam) राज्यस्तरावर घेतली जाते.
  • NTSE Stage 2 – (National Level Exam) राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते.

टीप : जे विद्यार्थी परीक्षेचे दोन्ही टप्पे पार करतात ते पीएच.डी.पर्यंत शिष्यवृत्तीसाठी पात्र होतात.

NTSE Eligibility – एनटीएससी ची पात्रता

स्टेज I (राज्य स्तर) साठी NTSE पात्रता

  • केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळांसह कोणत्याही मान्यताप्राप्त खाजगी/सरकारी शाळांमधून सध्या इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • NTSE स्टेज I परीक्षेसाठी उमेदवार त्यांच्या संबंधित राज्यामध्ये हजर राहून पेपर देऊ शकतात येथे कोणतीही अधिवास (domicile) चे बंधन नाही.
  • तुम्ही जर स्टेट बोर्डातून (SCERT) पेपर साठी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला स्टेज I परीक्षेसाठी कोणत्याही अतिरिक्त पात्रतेची मागणी करू शकते जसे की मागील वर्गातील किमान पात्रता गुण.
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) किंवा स्टेट ओपन बोर्ड यासारख्या ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) मधून शिक्षण पूर्ण करणारे उमेदवार देखील NTSE साठी अर्ज करण्यास आणि उपस्थित राहण्यास पात्र आहेत.
  • शिष्यवृत्ती परीक्षेला बसताना खुल्या आणि दूरस्थ शिक्षणातून(Open and Distance Learning) शिकणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. शिवाय, ते काम करत नसावेत (अर्धवेळ नोकरी देखील नाही) आणि त्यांनी प्रथमच इयत्ता 10वी पात्रता परीक्षेत बसले पाहिजे.

स्टेज I (राज्य स्तर) साठी NTSE पात्रता

स्टेज II (राष्ट्रीय स्तर) साठी NTSE पात्रता

भारतात शिकणाऱ्या उमेदवारांसाठी:

NCERT द्वारे NTSE स्टेज II परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी खाली नमूद केलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे –

  • ते भारतीय नागरिक असले पाहिजेत, मग ते त्यांची इयत्ता 10वी ची पात्रता परीक्षा कुठेही देत असो. मग ते भारतात देतील किंवा परदेशात.
  • त्यांनी राज्य स्तरावर स्टेज I परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

भारताबाहेर शिकणाऱ्या उमेदवारांसाठी:

भारतीय नागरिक असले परंतु परदेशात शिकणारे भारतीय राष्ट्रीय उमेदवार NTS शिष्यवृत्ती स्टेज II परीक्षेसाठी थेट उपस्थित राहू शकतात

  • त्यांनी त्यांच्या मागील पात्रता परीक्षेत म्हणजे इयत्ता 9वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळवले असावेत.
  • अशा उमेदवारांनी NTSE शिष्यवृत्ती प्राप्त केल्यानंतरच त्यांचे उच्च शिक्षण भारतात घेण्याचे नियोजन केले पाहिजे.

 

NTSE शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीची सामान्य आवश्यकता

  • ज्या उमेदवारांना शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांना केवळ विज्ञान, सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवाहातील (Science, Social Sciences, Engineering and Medical streams only) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी आहे. त्यांनी केवळ भारतातच उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगली पाहिजे.
  • उमेदवारांनी त्यांच्या शाळेत चांगली वागणुक ठेवल्याचे प्रमाणित केले पाहिजे आणि त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवावे
  • रीतसर सुट्टी दिल्याशिवाय किंवा शाळा अधिकाऱ्यांना कळवल्याशिवाय त्यांनी शाळेत गैरहजर राहू नये
  • उमेदवार हा पूर्णवेळ विद्यार्थी असावा आणि तो कुठेही काम करत नसावा किंवा पगार/स्टायपेंड मिळत नसावा.
  • जर एखाद्या उमेदवाराला इतर कोणत्याही योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळत असेल, तर त्याला/तिला कोणती शिष्यवृत्ती योजना सुरू ठेवायची आहे हे ठरवावे लागेल.
  • जर कोणत्याही उमेदवाराला इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळत असेल तर, त्याची/तिची NTS शिष्यवृत्ती त्या वर्षासाठी थांबवली जाईल आणि त्याने/तिने NCERT ला शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याची विनंती केल्यानंतरच ती चालू ठेवता येईल; त्यांना इतर शिष्यवृत्ती योजनांचे लाभ बंद करावे लागतील.
  • फी माफी / एकवेळ अनुदान / फी सबसिडी आणि निवास मिळवणारे उमेदवार NTSE शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
  • जर कोणत्याही उमेदवाराने प्रवेश घेतल्याच्या एका वर्षाच्या आत अभ्यास सोडला किंवा त्याचे शिक्षण बंद केले, तर त्याला शिष्यवृत्ती दिली जाणार नाही
  • उमेदवारांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचे सर्व विषय पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केले पाहिजेत. जर ते कोणत्याही मुख्य विषयात असे करू शकले नाहीत तर त्यांची शिष्यवृत्ती रद्द केली जाईल.

 

NTSE परीक्षेची प्रक्रिया

NTSE परीक्षेची प्रक्रिया
NTSE परीक्षेची प्रक्रिया

 

 

NTSE परीक्षेचे स्वरुप

NTSE परीक्षेचे स्वरुप
NTSE परीक्षेचे स्वरुप

 

NTSE मध्ये मिळणारी शिष्यवृत्तीचा तपशिल (दरमहा)

NTSE मध्ये मिळणारी शिष्यवृत्तीचा तपशिल (दरमहा)
NTSE मध्ये मिळणारी शिष्यवृत्तीचा तपशिल (दरमहा)

NTSE Exam Centres for Stage 1

  • स्टेज 1 मध्ये पेपर हा आपल्या जिल्हातील सरकारी नवोदय किवा जिल्हा परिषद च्या शाळेवर घेण्यात येते.

 

NTSE Exam Centres for Stage 2

  • KV, Bhandup, LBS Marg, Kanjurmarg West
  • KV, BEG, Near Deccan College, Pune

 

NTSE Syallabus – अभ्यासक्रम

एनटीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम हा नववी आणि दहावी च्या क्लास लेवल नुसार असतो. एनटीएससी ची पहिली परीक्षा म्हणजेच (Stage 1) परीक्षेचा सिल्याबस हा राज्यस्तरानुसार (State Level) असेल तर आपापल्या राज्यातील state board चा अभ्यास करणे महत्वाचे आहे आणि

दुसरी परीक्षा म्हणजेच (Stage 2) चा Syllabus हा राष्ट्रीय स्तरानुसार (National Level) असेल. तर तुम्ही ncert च्या बुक तुम्ही अभ्यास करू शकता,

एनटीएससी ची परीक्षाही Multiple Type Questions (MCQ) प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात. ज्यात तुम्हाला चार पर्यायांमधून एक योग्य पर्याय निवडायचा असतो. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग ची पद्धत नसते तुमच्या एक योग्य उत्तरास एक मार्क देण्यात येतो.

ज्यामध्ये तुम्हाला ]परीक्षेत गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांसह मानसिक क्षमता चाचणी (MAT), शैक्षणिक योग्यता चाचणी (SAT), इंग्लिश, जनरल नॉलेज सारख्या विषयांचा समावेश होतो.

 

NTSE Paper Pattern – पेपर नमुना

एनटीएससी परीक्षेचा पेपर हा इंग्लिश मीडियम आणि हिंदी मिडीयम मध्ये घेतला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी या दोन्ही भाषांमधून एक भाषा निवडावी लागते. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून असतात. ते विद्यार्थी इंग्लिश मध्ये पेपर देऊ शकता जे विद्यार्थी हिंदी मिडीयम असतात ते हिंदी निवडून हिंदीमध्ये पेपर देऊ शकतात. हे पेपर दोन भागांमध्ये डिव्हाइड होतील त्यात पहिला म्हणजे Mental Ability Test आणि दुसरा म्हणजे Scholastic Ability Test असतो.

  • Mental Ability Test (MAT) मध्ये एकूण शंभर प्रश्न असतात आणि हा टेस्ट 120 मिनिटांचा असतो.
  • Scholastic Ability Test (SAT) मध्ये एकूण शंभर प्रश्न विचारलेले असतात आणि हा टेस्ट 120 मिनिटांचा असतो.

एससी (SC) एसटी (ST) (OBC) ओबीसी सारख्या आरक्षित विद्यार्थ्यांसाठी 32% गुण हे पास होण्यासाठी आवश्यक असतात. आणि तेथेच जनरल कॅटेगिरी साठी 40% गुण मिळवणे आवश्यक असतात.

 

परीक्षा च्या दिवशी घ्यायची  काळजी

राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी काही नियम पाळणे आवश्यक आहे ती खालीलप्रमाणे:

  • उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र, पेन्सिल, पेन आणि फोटो ओळखपत्र परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • सर्व उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान ४५ मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे.
  • परीक्षा सुरू झाल्यापासून 15 मिनिटांपेक्षा जास्त उशीर झालेल्या कोणत्याही उमेदवाराला ते लिहिण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॉनिक गॅझेटला परवानगी नाही.

FAQ :-
  • स्टेज 2 परीक्षा दिल्यानंतर NCERT काही मुलाखती घेते का?

Answer – नाही, NTSE शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवाराला फक्त स्टेज 1 आणि 2 परीक्षांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे.

  • NTSE अधिकृत वेबसाइट काय आहे

Answer – पुढील दिलेली अधिकृत वेबसाइट:  https://ncert.nic.in/national-talent-examination.php

error: अहो थांबा ! अस नसता करत. तुम्ही हे दुसरीकडे पाठवा