मित्रांनो आपण C-DAC बद्दल माहिती या लेखात घेणार आहोत. तसे कॉविड १९ नंतर जग IT आणि संगणकाशी संबधित व्यवसाय निवडत होते आणि मोठ्या प्रमाणत नोकऱ्या त्या काळामध्ये निर्माण झाल्या. त्या संगणकशी संबधित नोकऱ्या मिळवणारे बरेच विध्यार्थ्यांना मोठे Packege मिळाले. तेव्हा CDAC आणि CCAT चे महत्व आणि मुलांनाचा तिकडे जाण्याचा कल वाढला. आणि तुम्ही पण पदवी पूर्ण केली असेल तर तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी हवी असेल तर तुम्ही C-DAC द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देऊ शकता. आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळवू शकता.
C-DAC – चा अर्थ
- English – Centre for Development of Advanced Computing Technology (C-DACT)
- मराठीमध्ये – प्रगत संगणन तंत्रज्ञान विकास केंद्र
C-DAC – चा इतिहास
- CDAC ची निर्मिती नोव्हेंबर 1987 मध्ये करण्यात आली.
- 1988 मध्ये, अण्वस्त्रे (Nuclear Weapon) विकसित करण्यासाठी भारत वापरत असल्याच्या चिंतेमुळे यूएस सरकारने भारताला क्रे सुपर कॉम्प्युटर विकण्यास नकार दिला.
- प्रत्युत्तर म्हणून, भारताने स्वतःचा सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यास सुरुवात केली आणि या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून C-DAC तयार करण्यात आला.
- डॉ विजय भटकर यांना CDAC चे संचालक म्हणून नियुक्त केले होते.
- या प्रकल्पाला तीन वर्षांचा प्रारंभिक रन आणि क्रे सुपर कॉम्प्युटरची किंमत ₹30,00,00,000 चा प्रारंभिक निधी देण्यात आला.
- प्रयत्नांचे अंतिम परिणाम म्हणजे 1991 मध्ये PARAM 8000 प्रसिद्ध झाले. हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर मानला जातो.
C-DAC – बद्दल
CDAC आज देशातील IT&E (माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स) मधील एक प्रमुख R&D संस्था म्हणून उदयास आली आहे जी क्षेत्रातील जागतिक घडामोडींच्या संदर्भात राष्ट्रीय तांत्रिक क्षमता बळकट करण्यासाठी आणि निवडलेल्या पायाभूत क्षेत्रांमध्ये बाजारपेठेतील बदलांना प्रतिसाद देण्यावर काम करते.
C-DAC – साठी नोंदणी कशी करावी
- सी-डॅकच्या पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन नोंदणीने सुरू होते.
- ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरताना उमेदवारांना सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
- नोंदणी केल्यावर, उमेदवारांना त्यांचा फॉर्म क्रमांक मिळेल जो लॉग इन करण्यासाठी, C-CAT अर्ज भरण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
- CDAC च्या सर्व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमांचे प्रवेश CDAC च्या संगणकीकृत कॉमन अॅडमिशन टेस्ट (C-CAT) द्वारे केले जातात.
C-DAC – साठीचा कालावधी
- CDAC चे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स हे 900 तासांचे (अंदाजे 26 आठवडे) पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत.
C-DAC – कोर्सेस शिकवण्याची पद्धत
- PG-DAC, PG-DBDA आणि PG-DAI हे कोर्सेस ऑफर करणार्या केंद्राच्या आधारावर पूर्णपणे ऑनलाइन किंवा पूर्णपणे तिथे हजर राहून शिकवल्या जाते.
- PG-DESD, PG-DITISS, PG-DMC, PG-DIoT, PG-DVLSI, PG-DASSD आणि PG-DHPCSA हे कोर्सेस ऑफर करणार्या सर्व प्रशिक्षण केंद्रांवर पूर्णत: शारीरिक पद्धतीने म्हणजे तिथे हजर राहून शिकवल्या जाते.
- PG-DRAT, PG-DGi, PG-DFBD आणि PG-DCSF हे अभ्यासक्रम उपलब्ध करणार्या सर्व प्रशिक्षण केंद्रांवर पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने वितरित केले जाते.
- ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी, विद्यार्थ्यांकडे त्यांच्या घरातून किंवा वैयक्तिक ठिकाणांहून प्रभावीपणे कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन, वेबकॅम आणि मायक्रोफोनसह लॅपटॉप/पीसी असणे आवश्यक आहे. मोबाइल फोनवरून ऑनलाइन वर्गात सहभागी होणे चालत नाही
हे वाचा – Bsc Forestry
C-DAC – साठी ची पात्रता
CDAC च्या सर्व PG डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी पात्रता
- आयटी / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन्स / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये अभियांत्रिकी (Engineering) पदवी
- (10+2+4 किंवा 10+3+3 वर्षे).
किंवा
- एमएससी/एमएस (१०+२+३+२ वर्षे) संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स.
C-DAC – अंतर्गत PG Diploma Courses
- PG Diploma in Advanced Computing (PGDAC)
- PG Diploma in Big Data Analytics (PG-DBDA)
- PG Diploma in Embedded Systems Design (PG-DESD)
- PG Diploma in IT Infrastructure, Systems & Security (PG-DITISS)
- PG Diploma in Artificial Intelligence (PG-DAI)
- PG Diploma in Internet of Things (PG-DIoT)
- PG Diploma in VLSI Design (PG-DVLSI)
- PG Diploma in Mobile Computing (PG-DMC)
- PG Diploma in Advanced Secure Software Development (PG-DASSD)
- PG Diploma in Geoinformatics (PG-DGi)
- PG Diploma in Robotics & Allied Technologies (PG-DRAT)
- PG Diploma in HPC System Administration (PG-DHPCSA)
- PG Diploma in FinTech & Blockchain Development (PG-DFBD)
- PG Diploma in Cyber Security & Forensics (PG-DCSF)
- PG Diploma in Unmanned Aircraft System Programming (PG-DUASP)
प्रवेश घेण्यसाठी तुम्ही येथे click करा. FAQs
-
CDAC अभ्यासक्रमासाठी कोण पात्र आहेत?
CDAC C-CAT च्या PG डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी किमान पात्रता निकष वर दिलेले आहे.
-
CDAC अभ्यासक्रमाची फी काय आहे?
CDAC अभ्यासक्रमाची कोर्स फी INR 90,000/- आहे.
-
CDAC अभ्यासक्रमाचा फायदा काय?
CDAC सरकारी कर्मचारी, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना IT मध्ये प्रशिक्षण प्रदान करते.
1 thought on “C-DAC बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये Free 2024”