कोतवाल विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये : Kotwal All Information in Marathi Free 2024

मित्रांनो तुम्हाला कोतवाल बनाचे असेल किंवा तुम्हाला या पदाविषयी माहिती हवी असेल, तर तुम्ही कोतवाल विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये  या योग्य ठिकाणी आला आहात. तुमच्या पैकी जर कोणाला कोतवाल बनायचे असेल तर त्याची पात्रता,  त्या पदासाठी लागणारी वयोमर्यादा, शिक्षण, कौशल, कोतवालाचे मानधन / वेतन / पगार, कोतवालांची संख्या, कोतवालाची कर्तव्ये आणि अधिकार आणि तुमच्याकडे कोणती कागद पत्रे हवी याची सर्व माहित या लेखात पाहू.

कोतवाल विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये : Kotwal All Information in Marathi

इतिहास

  • मित्रांनो कोत वाल पदाविषयी माहिती घेतांना तुम्हाला त्याचा इतिहास पण माहिती असायला पाहिजे.
  • कोतवाल हे पद मोगल काळापासून अस्तित्वात आहे. ते पद गावातील प्रशासन चालवण्यासाठी निर्माण करण्यात आले. यामध्ये जो मुख्य वर्ग जागल्या रामोशी इत्यादी लोक कनिष्ठ ग्रामनोकर म्हणून गावांमध्ये राहून पोलीस पाटलाची मदत करत असत.
  • सुरुवातीला कोत वाल या पदासाठी वंश परंपरा होती. मुंबई कनिष्ठ ग्राम वतन निर्मूलन कायदा-1959 पासून राज्यातील वंश परंपरागत किंवा वतनी गाव कामगारांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर गावच्या लोकसंख्येनुसार कोत वालाचे नियमित मानधन घेणारे पद निर्माण करण्यात आले. कोत वालाचे पद काही काळ जिल्हा परिषदेकडे देण्यात आले होते. पुन्हा दिनांक 1 डिसेंबर 1959 पासून कोत वालाची पुन्हा महसूल विभागाकडे देण्यात आले.
  • ते हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ (Class 4th)चे पद आहे.

कोतवाल पदासाठीची पात्रता :

  1. तो व्यक्त्ती स्थानिक गावाचा रहिवासी असावा.
  2. कोतवाल म्हणून नेमणूक होण्यासाठी व्यक्तीचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्ष इतके असावे.
  3. उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असावा. (पण येणाऱ्या भरती मध्ये शिक्षण वाढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही )
  4. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्यवान असावा.
खालील दिलेल्या पात्रता काही ठिकाणी लागू पडतील.
  1. कुळकायद्याप्रमाणे नमूद केलेल्या जमिनीपेक्षा जास्त जमीन संबंधित व्यक्तीने धारण नसावी.
  2. नियुक्तीच्या वेळी कोत वालास 100 रु. तारण व दोन जमीन द्यावे लागतात.
  3. नेमणुकीपूर्वी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस सब – इन्स्पेक्टरची परवानगी घ्यावी लागते.
  4. नेमणूक करताना पूर्वीच्या गाव वतनदार कनिष्ठ ग्रॅनोकराना प्राधान्य दिले जाते.
  5. कोत वालाची नेमणूक तहसिलदार करतात. (पहिली नेमणूक सहा महिन्यासाठी )

कोतवालाचे मानधन / वेतन / पगार  :

  • वेतन 5000 – 7000 रु. ( 2012 पासून ) परंतु या वेतनात वाढ झालेली आहे

गावची लोकसंख्या व त्याप्रमाणात कोतवालांची संख्या पुढीलप्रमाणे :

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या गावची लोकसंख्या वेगवेगळी असते. तर त्या लोकसंख्यच्या आधारावर आपल्या गावामध्ये किती कोत वाल हवे हे या लोकसंख्यावरून ठरत असते.

  • 1000 पर्यंत लोकसंख्या असेल तर  – 1 संख्या
  • 1001 ते 3000 पर्यंत लोकसंख्या असेल तर – 2 संख्या
  • 3000 हून अधिक लोकसंख्या असेल तर – 3 संख्या
  • एखाद्या गावात 3 पेक्षा अधिक कोत वाल नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतात. परंतु त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते.

महसूल प्रशासन आणि त्यांच promotion खालीलप्रमाणे –

  • खालील दिलेली माहिती वरून तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जर कोत वाल म्हणून जर तुमची नेमणूक जरी झाली तर तुमची promotion होत तुम्ही कुठ पर्यत पोहचू शकता.
  • जिल्हाधिकारी – उपजिल्हाधिकारी – तहसीलदार – नायब तहसीलदार – महसूल मंडळ अधिकारी – तलाठी – कोतवाल

कोतवालावर नियंत्रण:

आता महत्वाचा प्रश्न असा कि या कोत वालावर लक्ष कोण ठेवते

तर मित्रांनो कोत वालावर जवळचे  नियंत्रण तलाठ्याचे असते.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोत वालावर जवळचे नियंत्रण पोलिस पाटील ठेवतो.

कोत वालाची नेमणूक तहसीलदार ( पहिली नेमणूक सहा महिन्यासाठी ) करतात.

किरकोळ रजा / सुट्टी ( 8 ते 12 दिवसाची ) – तलाठी देतात.

अर्जित रजा ( 30 दिवसाची ) – तहसीलदार देतात.

कोतवालाची कर्तव्ये आणि अधिकार.

  • गावातील शासकीय कागदपत्रे ने – आण करणे.
  • शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे.
  • लसीकरण मोहीमेत मदत करणे.
  • अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीस पाटलांना मदत करणे.
  • आवश्यक तेव्हा गावकऱ्यांना चावडी व सज्जा (तलाठी जेथे बसतात) येथे बोलावणे.
  • गावातील चावडी व सज्जा कार्यालयाची स्वच्छता ठेवणे.
  • गावातील जन्म, मृत्यू व विवाह यांच्या नोंदीची माहिती ग्रामसेवकाला देणे.
  • पोलीस पाटलाच्या  ताब्यात असलेल्या कैद्यांवर पहारा देणे.
  • गावातील गुन्ह्यासंबंधी पोलीस पाटलास माहिती देणे.
  • तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांच्या कामात मदत करणे.
  • वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली कामे पार पाडणे.
  • सरकारचे पत्रव्यवहार पोचविणे.

हि माहिती तुम्ही आमच्या Youtube Channel पाहू शकता

FAQ

Ques : 1) कोत वाल चे काम काय असते?

Ans :  गावातील शासकीय कागदपत्रे ने – आण करणे, शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे, लसीकरण मोहीमेत मदत करणे, अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीस पाटलांना मदत करणे.

Ques : 2) महाराष्ट्रात कोत वालची नेमणूक कोण करते?

Ans : तहसीलदार नेमणूक करते.

3 thoughts on “कोतवाल विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये : Kotwal All Information in Marathi Free 2024”

Leave a comment

error: अहो थांबा ! अस नसता करत. तुम्ही हे दुसरीकडे पाठवा