कृषी सहायक कसे बनावे 2024 मध्ये Krushi Sahayak Kase Banave Free

जर तुम्हाला 2024 मध्ये कृषी सहायक कसे बनावे याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मित्रानो सर्वाना माहिती आहे कि, प्रत्येक खेड्यागावामध्ये एक तरी कृषी सहायक आहे. आणि तो शासनाने नियुक्त केलेला अधिकारी असतो. जो सरकार आणि शेतकरी याच्यातील दुव्याचे काम करतो. तो व्यक्ती शेतकऱ्यांना कोणती पिके घ्यावी, कोणती पिके निवडावी, त्याची लागवड कशी करावी, सरकारी बियाणांची वाटप करणे, शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देणे, शेतकरी गट स्थापन करणे आणि त्यांना या कामात मदत करणे. हे या व्यक्तीचे काम असते. आपण या लेखामध्ये कृषी सहायक कसे बनावे, त्यांची कार्य, कृषी सहाय्यक याचा  पगार, कृषी सहाय्यक याची पात्रता, आणि कृषी अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते या सर्व मुद्यांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

2023 मध्ये कृषी सहायक कसे बनावे

कृषी सहाय्यक माहिती (Krushi Sahayak Information in Marathi)

  • कृषी सहाय्यक हा राज्य प्रशासनाने निवडून दिलेला कृषी विकासकामासाठी काम करणारा गावातील महत्वाचा घटक असतो.
  • त्याचे कार्यक्षेत्र साधारणत: २ ते ३ गावांपुरते मर्यादित असते.
  • हा गाव पातळीवर कार्य करणारा कर्मचारी असून त्याच्यावर नजीकचे नियंत्रण मंडळ कृषी अधिकाऱ्याचे असते.

कृषी सहायक चे कामे 

कृषी सहायक चे विविध प्रकारचे कामे असतात पण प्रामुख्याने सांगायचे झालेस तर ते खालील मुद्यामध्ये आहे

  • सुधारित व संकरीत बी-बियाणांचा प्रचार व प्रसार करणे, शेतीउत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे,
  • पाणलोट क्षेत्र विकास, मृदा व जलसंवर्धन कार्यक्रम आणि कृषी विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, आपत्कालीन सर्वेक्षण व मदत करणे,
  • गावाचा वार्षिक कृषी आराखडा तयार करणे व तो ग्रामसभेत वाचणे, इत्यादी कामे कृषी सहाय्यक गाव पातळीवर करतो.

कृषी सहाय्यक पात्रता

कृषी सहाय्यक पात्रता
कृषी सहाय्यक पात्रता

 

तुम्हाला जर कृषी सहाय्यक बनायचे असेल तर खालील दिलेल्या पात्रता तुमच्याकडे असयला पाहिजे.

  • शासनमान्य संस्थेमधून कृषि विद्यापीठाचा डिप्लोमा पूर्ण असावा.
  • जर तुम्ही कृषी क्षेत्रातील पदवीधर असाल तर तुम्ही कृषी अधिकारी होण्यासाठी पात्र ठरता. किवा तुमची बढती लवकर होते.
  • उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि ३० पेक्षा जास्त नसावे.
  • राखीव प्रवर्गातील अर्जदारांसाठी कमाल वयोमर्यादा शिथिल आहे.
  • या पदासाठी तुमच्याकडे बागकाम आणि शेतीची माहिती असावी.

 

कृषी सहाय्यक पगार (krushi sahayak salary)
कृषी सहाय्यक पगार (krushi sahayak salary)

कृषी सहाय्यक पगार (Krushi Sahayak Salary)

  • कृषी सहाय्यक पगार हा दरमहा कमीत कमी रू. 5,400 / – आणि
  • जास्तीत जास्त पगार रू. 25,200 / –
  • प्रत्येक महिन्याला कृषी सहाय्यक ग्रेड पे वेतन (भत्ते) सह रु. 2,900 / –

कृषी सहाय्यक भरती २०२३

  • कृषी सहाय्यक भरती २०२३ हि भरती काही जिल्ह्यामध्ये होणार असून जिथे हि पदे रिक्त आहे तेथे हि पदे भरली जाणार आहे. तर त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आणि पेपर pattern कसा आहे ते आपण समजून घेऊ.

कृषी सहाय्यक प्रश्नपत्रिका

  • कृषी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या कृषी सेवकच्या परीक्षेत वेगळे विभाग असतील.
  • पेपर हा एकूण 200 गुण आहेत.
  • उमेदवारांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी 120 मिनिटे दिली जातात.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश किंवा 0.25 नकारात्मक चिन्हांकन असेल.

Subjects विषय

No. of Questions प्रश्नांची संख्या Marks गुण Time वेळ

सामान्य इंग्रजी

15 प्रश्न 30 गुण 120 मिनिट

मराठी

15 प्रश्न 30 गुण

सामान्य ज्ञान

15 प्रश्न 30 गुण

बुद्धिमत्ता चाचणी

15 प्रश्न 30 गुण

कृषी विषय

40 प्रश्न

80 गुण

Total

100

200

120 मिनिट

कृषी सहाय्यक पदासाठीचा अभ्यासक्रम

  • मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह , वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे, विरुद्ध शब्द, वाक्याचा एक शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन,प्रतिशब्द आणि प्रतिशब्द, विशिष्ट प्रस्तावांनंतरचे शब्द आणि व्याकरणाशी संबंधित काही प्रश्न
  • इंग्रजी– Antonyms, Synonyms, Reading Comprehension, Error Spotting/ Phrase Replacement, Fill in the Blanks, Unseen Passages, Missing Verbs., Word Formation., Articles., Grammar., Adjectives., Para Jumbles., Idioms & Phrases., Close Test., Sentence Corrections., Verb., Adverb., Meanings., Subject-verb Agreement., Sentence Rearrangements.

    सामान्य ज्ञान आणि सामान्य बुद्धिमत्ता : –

  • सामान्य ज्ञान: – इतिहास भूगोल, जग तसेच भारतात, नागरिकशास्त्र इत्यादी
  • महाराष्ट्राचा भूगोल: – महाराष्ट्र भौतिक भूगोल, मुख्य भौतिकशास्त्र विभाग, हवामान, लोकसंख्या, लोकसंख्या स्थलांतर आणि स्रोत आणि गंतव्यस्थान.
  • महाराष्ट्राचा इतिहास: – सामाजिक व अर्थव्यवस्था प्रबोधन,
  • भारतीय राज्यघटना: – केंद्रीय आणि राज्य संबंध, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ भूमिका, अधिकार, काम आणि भूमिका, कायदा समित्या.
  • बुध्दिमापन विषयक प्रश्न उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
  • गणित अंकगणित बीजगणित भूमिती सांख्यिकी
  • सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र व पर्यावरण
  • चालू घडामोडी भारतातील व महाराष्ट्रातील
  • संगणक व तंत्रज्ञान: – समाजातील आधुनिक संगणक भूमिका, सॉफ्ट वेअर डेव्हलपमेंट, डेटा कम्युनिकेशन, नेट बँकिंग सर्व्हिस, टेक्नॉलॉजी इ.
  • तार्किक क्षमता :-वय, क्षेत्र., सरासरी., बँकरांचे, सूट., नौका आणि प्रवाह., दिनदर्शिका., साखळी नियम.,घड्याळ., दशांश अपूर्णांक, सी.एफ. आणि एल.सी.एम, उंची आणि अंतर, लोगारिदम, मिश्रण आणि आरोप., क्रमांक., भागीदारी.परवानग्या.,जोड्या.,पाईप्स आणि सिस्टर्न, संभाव्यता, नफा आणि तोटा ,शर्यती आणि खेळ., मालिका – ऑड मॅन आउट, मालिका – गहाळ क्रमांक शोधा, साधे व्याज, चक्रवाढ व्याज., सरलीकरण., स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट., साठा आणि शेअर्स., सर्ड्स आणि इंडेक्स., वेळ आणि अंतर, वेळ आणि कार्य, गाड्या.,काही गणिती ऑपरेशन्स., विश्लेषण आणि सादृश्याशी संबंधित समस्या, वर्गीकरण, दिशानिर्देशांसह समस्या, कॅलेंडरवर समस्या.,वेन आकृती.,वर्णमाला मालिका आणि क्रमांक मालिका,कोडिंग आणि डिकोडिंग
  • कृषी विषय : – शेतीमधील ऐतिहासिक घडामोडी, एकात्मिक शेती प्रणाल्या, तण वनस्पती आणि त्यांचे व्यवस्थापन, वनीकरण, पाणलोट व्यवस्थापन, जैव-विविधता, वनस्पती पेशींची अल्ट्रा रचना, वनस्पती अनुवांशिक संसाधने, ऊतक संस्कृती आणि वनस्पती अनुवांशिक अभियांत्रिकी, न्यूरोफिजियोलॉजी, ग्लोबल वार्मिंग, मृदांचे प्रकार, उर्वरक नियंत्रण, कीटकांचे मॉर्फोलॉजी, वनस्पती रोग, बागायती पिके, औषधी वनस्पती आणि बुरशीनाशक, कृषी अर्थशास्त्र, कृषी-आधारित उद्योग, फलोत्पादनाचे महत्त्व, कापणीनंतरचे तंत्रज्ञान, विस्तार शिक्षण सेलची रचना इ.

कृषी अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते ?

  • कृषी अधिकारी होण्यासाठी तुम्ही प्रथम तुमची कृषी पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली पाहिजे.
  • कृषी पदवीधर पदवी प्राप्त केल्यानंतर कृषी अधिकारी पदासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • कृषी अधिकाऱ्याच्या नियुक्तीची अधिसूचना कधीकधी दिसून येते.
  • कृषी अधिकारी ची रिक्त जागा उपलब्ध झाल्यावर तुम्ही अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
  • अर्ज केल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते.
  • लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
  • मुलाखतीत चांगली कामगिरी करणाऱ्यांची कृषी अधिकारी पदासाठी निवड केली जाते.
अधिक माहिती – कोतवाल कसे बनावे

FAQ

Question 1)  कृषी सेवक म्हणजे काय?

Answer – राज्यातील कृषी विकासासाठी नेमणूक केलेला गावातील काम करणारा गावातील घटक.

Question 2)  कृषी म्हणजे काय?

Answer – आपण हा शब्द शेतीशी निगडीत समजतो. याचा इतिहास आहे,  कृषि : हा शब्द ‘कृष्’ म्हणजे ‘नांगरणे’ या धातूपासून झाला आहे.

2 thoughts on “कृषी सहायक कसे बनावे 2024 मध्ये Krushi Sahayak Kase Banave Free”

Leave a comment

error: अहो थांबा ! अस नसता करत. तुम्ही हे दुसरीकडे पाठवा