Bsc Forestry बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये Free 2024

Bsc Forestry – खूप महत्वाची आणि कमी परीचयातील पदवी म्हणजे  bsc forestry. आणि याचं पदवी बद्दल आपण सर्व माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत. या पदवी बद्दल असलेले सर्व प्रश्न या लेखामध्ये तुमचे सुटतील. या लेखामध्ये आपण या पदवीचा कार्यकाळ पाहणार आहोत आणि या पदवीला प्रवेश घेण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते. ही पदवी मिळवली तर पुढे मार्ग आहे का? या मध्ये कोणती post मिळत असते, त्यांचा पगार किती मिळतो या सर्वाची माहिती आपण येथे पाहूया तर चला सुरुवात करूया.

Bsc Forestry बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये

 

Bsc Forestry – Meaning – अर्थ

  • Bachelor of Science in Forestry – फॉरेस्ट्री मध्ये विज्ञान पदवी   

 

What Is Bsc Forestry

  • हा चार वर्षांचा अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे जो 8 सेमिस्टरमध्ये विभागला जातो.
  • बीएससी फॉरेस्ट्री विद्यार्थ्यांना वृक्षारोपण, विविध नगदी पिके, अभयारण्ये, वनस्पति उद्यान आणि जंगले यांच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देते.

 

Bsc Forestry Eligibility

Bsc Forestry Eligibility
Bsc Forestry Eligibility

 

बीएससी फॉरेस्ट्री पात्रता निकषानुसार

  • विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून किमान एकूण ५०% गुणांसह बारावी पूर्ण केलेली असावी.
  • या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचे किमान गुण प्रत्येक संस्थेनुसार बदलतात त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना आवश्यक असलेल्या किमान गुणांची क्रॉस-तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.
  • बारावीची परीक्षा देणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत, परंतु प्रवेश घेतानी वरती दिलेले टक्के प्राप्त असायला पाहिजे.
  • तुम्ही महाविद्यालय/राष्ट्रीय स्तरावरील ICAR प्रवेश परीक्षा दिलेली पाहिजे. आणि पात्रता परीक्षेत किमान एकूण ५०% गुण प्राप्त झालेले उमेद्वार उत्तीर्ण असतील.
  • हा कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

Bsc Forestry Entrance Exam

What is ICAR Exam?

ICAR AIEEA (UG) – ही अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आहे. कृषी विद्यापीठांमधील बॅचलर पदवी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. ICAR परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतील प्रश्नांचा समावेश असतो आणि परीक्षेतील प्रश्न भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषी आणि गणित या विषयांमधून विचारले जातात. हा अभ्यासक्रम करण्याची योजना आखत असलेल्या सर्व उमेदवारांनी समजून घेणे आवश्यक असलेली सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे त्यांनी नवीनतम परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमानुसार समर्पितपणे अभ्यास केला पाहिजे. मुख्यतः, जवळजवळ सर्वच प्रवेश परीक्षांमध्ये पाच विभाग आहेत, जे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शेती, गणित.

Bsc Forestry Course Fee

  • या course ची फी ही रू 35,000 प्रतिवर्ष आहे. परंतु महाविद्यालय आणि त्यांच्या नियमानुसार बदलू शकते.

Bsc Forestry Course Duration

  • या course चा कालावधी हा 4 वर्षाचा आहे जो 8 सेमिस्टरमध्ये विभागला जातो

Bsc Forestry Syllabus

  • प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये – नागरी संस्कृतीचे तत्त्व, वन पर्यावरणशास्त्र, सायटोलॉजी आणि सामान्य जैवरसायनशास्त्र यासारख्या मुख्य पैलूंशी संबंधित आहे
  • दुसऱ्या वर्षीचा अभ्यासक्रमामध्ये – डेंड्रोलॉजी, वन माती विज्ञानाची तत्त्वे, सर्वेक्षण इत्यादी विषयांचा समावेश आहे.
  • तृतीय वर्षीचा अभ्यासक्रमामध्ये – वन अर्थशास्त्र तत्त्वे आणि प्रकल्प नियोजन, विस्तार शिक्षण मूलभूत तत्त्वे, वन व्यवसाय व्यवस्थापन, वन्यजीव व्यवस्थापन.
  • चौथ्या वर्षीचा अभ्यासक्रमामध्ये – वनीकरण कामाचा अनुभव, अनुभवात्मक शिक्षण (औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया) कामाचा अनुभव.
  • काही  महाविद्यालयात विषय भिन्न असू शकतात, परंतु बहुतेक सर्वच महाविद्यालयांमध्ये फॉरेस्ट्रीमधील बीएससी अभ्यासक्रमाच्या संकल्पना सारख्याच आहेत.

Bsc Forestry Specializations

Bsc Forestry Specializations

  • Dendrology
  • General forest microbiology
  • Forest ecology
  • Forest Management

MSc Forestry – Post Graducation

  • MSc Forestry ही २ वर्षांची पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी आहे जी तुम्हाला वनीकरण आणि त्याचा वापर या क्षेत्रातील तुमचे ज्ञान वाढविण्यास सक्षम करते.

 

Bsc Forestry Colleges In India

  • जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ
  • इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी आणि अॅग्रोसायन्सेस
  • वसंतराव नायर मराठवाडा कृषी विद्यापीठ
  • नॉर्थ ईस्टर्न रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी
  • ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ
  • मेवाड विद्यापीठ
  • डॉल्फिन पीजी इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल अँड नॅचरल सायन्सेस
  • गुरु घासीदास विद्यापीठ
  • नरेंद्र देवा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ
  • हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

Bsc Forestry Colleges In Maharashtra

  • कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली
  • डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
  • डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
  • के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई

Bsc Forestry Jobs

तुम्ही ही पदवी मिळवल्यानंतर

  • सहाय्यक व्यवस्थापक(Assistant Manager),
  • नर्सरी मॅनेजर(Nursery Manager),
  • फार्मिंग मॅनेजर(Farming Manager),
  • प्राणीशास्त्रीय उद्यानात
  • अॅग्री-क्रेडिट मॅनेजर (Agri-Credit Manager),
  • फार्मिंग मॅनेजर किंवा शिक्षक(Farming Manager or teacher)

म्हणून सार्वजनिक किंवा खाजगी संस्थेत सामील होऊन काम करू शकतात.

Bsc Forestry Scope

तुम्हाला खालील दिलेल्या ठिकाणी संधी मिळते.

  • प्राणी उद्यान,
  • वन्यजीव श्रेणी,
  • वन्यजीव संशोधन संस्था,
  • भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद (ICFRE),
  • वन्यजीव विभाग,
  • वन रोपवाटिका इ.
  • तुम्ही PG करू शकता

https://youtu.be/0BGtz1N1ZG8

 

Bsc Forestry Salary

  • बीएससी फॉरेस्ट्रीचा सरासरी पगार वार्षिक INR 3 लाख ते 7 लाख दरम्यान असतो.

 

अधिक वाचा :- कृषी सहायक

4 thoughts on “Bsc Forestry बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये Free 2024”

Leave a comment

error: अहो थांबा ! अस नसता करत. तुम्ही हे दुसरीकडे पाठवा