मित्रानो तुम्हाला इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये आवड असेल आणि तुम्हाला Wireman ITI Course Details in Marathi मध्ये महिती हवी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मिंत्रानो आपण प्रत्येक गावात पाहतो की light गेली कि आपण लगेच वायरमन ला फोन करतो आणि light का गेली ते विचारतो. आपल्या जवळचे हे पद असते आणि आपण लहानपणापासून या व्यक्तीला पहालेले असते त्यामुळे या पदाबद्दल आपल्याला कुतूहल असत. या लेखामध्ये आपण वायरमन कसे बनावे?, वायरमन चे काम काय असते?, शैक्षणिक पात्रता काय लागते?, किती कालावधीचा हा कोर्से असतो?, अभ्यासक्रम काय असतो, वायरमन चे licence कसे काढावे? या सर्वाची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Wireman म्हणजे काय?
वायरमन हा 2 वर्षांचा नोकरी मिळून देणार तांत्रिक अभ्यासक्रम आहे. या मध्ये वीज, विद्युत प्रवाहाविषयी, विद्युत प्रवाहाचे प्रकार, मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स मोटर्स आणि विजेशी संबंधित अनेक संज्ञांचा अभ्यास केल्या जातो. या कोर्समध्ये तुम्हाला वायरिंगमध्ये वापरली जाणारी वेगवेगळी साधने आणि उपकरणे वापरण्यासही शिकवले जाते. तुम्हाला येथे सैद्धांतिक (theoretical) ज्ञानाबरोबरच व्यावहारिक (practical) ज्ञानही दिले जाते.
तुम्हाला वायरिंग करणे, सर्किट बनवणे, पॉवर कनेक्शन देणे, वायरिंग मेंटेनन्स आणि बरेच काही शिकवले जाते. या कोर्समध्ये तुम्हाला कॉस्टिंग, कोणत्या वायरची आणि वायरिंगची किंमत किती आहे हे देखील सांगितल्या जाते. वायरिंगमध्ये किती थर आहेत आणि त्या थरांमध्ये कोणती सामग्री वापरली जाते याबद्दल माहिती दिल्या जाते. वायरिंग किंवा कोणतेही धोकादायक काम करताना तुम्हाला सर्व सुरक्षा उपाय आणि खबरदारी याबद्दल देखील माहिती मिळते.
Wireman Course Eligibility – पात्रता
आयटीआय वायरमन कोर्सची पात्रता
- तुंम्ही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून(State Board) इयत्ता 8 वी उत्तीर्ण असावा.
- तुंम्ही 10 वी किंवा 12 वी झाल्यानंतरही हा course करू शकता.
- तुम्हाला प्रवेश हा तुमच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे दिला जातो.
- या कोर्से साठी तुमच्याकडे इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे लागते.
- काही संस्था किंवा महाविद्यालये प्रवेशापूर्वी प्रवेश परीक्षा घेतात.
ITI Wireman Syllabus – अभ्यासक्रम
Sr.N. |
ITI Wireman Subjects |
1 |
Professional Knowledge (Theory) |
2 |
Professional Skills (Practical) |
3 |
Engineering Drawing |
4 |
Employability Skills |
5 |
Workshop Calculation and Science |
Wireman Course Duration – कालावधी
- या कोर्सचा कालावधी 2 वर्षांचा आहे. आणि 2 वर्षांचा कालावधी पुढे 4 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक सेमिस्टरमध्ये 6 महिन्यांचा कालावधी असतो म्हणजेच ITI वायरमन कोर्सचा कालावधी 24 महिने असतो. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी ठराविक तासांचे वर्ग दिले जातात.
Wireman Course Fees – फी Wireman ITI Course Details in Marathi
आयटीआय वायरमन कोर्सची फी तुम्हाला ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्यावर अवलंबून असते कारण वायरमन आयटीआय कोर्सची फी संस्थेच्या प्रकारानुसार बदलते. एससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील विद्यार्थ्यांपेक्षा कमी फी मिळते.
- सरकारी संस्था:- ₹500 – ₹5,000
- खाजगी संस्था:- ₹5,000 – ₹50,000
ITI Wireman Admission – प्रवेश
- ITI वायरमन अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य-राज्यात चढ-उतार होत असतात कारण काही राज्ये गुणवत्ता यादीच्या आधारे सरकारी ITI महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात तर काही प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश घेतात. फॉर्म सबमिशनच्या वेळी नोंदणी शुल्क आकारले जाऊ शकते. प्रवेशासाठी अर्ज साधारणपणे मे महिन्यात प्रसिद्ध केला जातो आणि जुलै महिन्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.
- तुम्ही प्रवेश घेण्यासाठी – येथे क्लिक करा.
Wireman Jobs – नोकरी
- इलेक्ट्रिक क्षेत्रात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्याकडे वायरमनची कमतरता असते, तुम्ही त्या कंपन्यांमध्ये अर्ज करू शकता. शासनाचे अनेक विद्युत प्रकल्प सुरू असून, त्या प्रकल्पांमध्ये वायरमन म्हणून नियुक्ती होऊ शकते. किंवा, तुम्ही स्वतंत्र इलेक्ट्रिशियन म्हणून देखील काम करू शकता.
- वायरमन हा एक रोजगाराभिमुख व्यवसाय आहे जो तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरीही मिळू शकते. या कोर्सद्वारे तुम्ही खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातही नोकरी मिळवू शकता.
ITI Wireman Salary – पगार
- तुमच्या कौशल्यावर आणि अनुभवावर पगार अवलंबून असतो. वायरमन चा पगार हा जास्त असू शकतो किंवा तो कमी असू शकतो. परंतु सरासरी, एका नवीन व्यक्तीला दरमहा सुमारे ₹15,000 ते ₹20,000 मिळू शकतात, म्हणजे ₹1,80,000 ते ₹2,40,000 प्रतिवर्ष.
Jobs Profile – नोकरी प्रोफाइल
- इलेक्ट्रिशियन (Electrician)
- लाईनमन (Lineman)
- वायरमन (Wireman)
- तंत्रज्ञ (Technician)
Wireman Career Options – करिअर पर्याय
- तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा कोर्स करू शकता.
- ITI वायरमन नंतर तुम्ही इतर डिप्लोमा कोर्स करू शकता.
- तुम्ही तुमचे उच्च माध्यमिक शिक्षण करू शकता.
- तुम्ही इतर व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकता.
- तुम्ही अप्रेंटिसशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू शकता.
Wireman Licence Maharashtra
- तुम्ही हा कोर्से केल्या नंतर तुम्हाला licence साठी येथे apply करावे लागते. आणि तुम्हाला खालील परीक्षा द्याव्या लागतात.
विद्युत तारतंत्री परीक्षा
विद्युत तारतंत्री परीक्षा हि वर्षातून दोनदा होते मे आणि नोव्हेंबर मध्ये.
या परीक्षेची पात्रता :- हि परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये अधिवास असणाऱ्यासाठी आहे.
या परीक्षेचे मार्क :- या परीक्षेसाठी 100 गुणाची तीन तासाची प्रात्यक्षिक परीक्षा आणि 50 गुणाची मौखिक चाचणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराने प्रात्यक्षिक परीक्षेत किमान 50 गुण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 25 गुण मिळवणे आवश्यक आहे.
परीक्षेचे शुल्क :- विद्युत तारतंत्री परीक्षेतील प्रवेश शुल्क रुपये ५०० रुपये असते.
इतर माहिती साठी तुम्ही खालील video पाहू शकता.